Jalna District

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम

जालना- महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना 2019 नुसार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात येणार आहे .त्यासाठी जिल्ह्यात अजूनही 3995 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही. त्यामुळे ते अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांसाठी शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली असून आता दिली आहे .15ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान संबंधित लाभार्थ्याने आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 सुरू केली. या योजनेचा आढावा दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी प्रधान सचिवांनी घेतला. त्यानुसार जिल्ह्यामध्ये एक लाख 71 हजार 625 एवढ्या कर्जदारांची यादी शासनाला प्राप्त झाली आहे, त्यापैकी एक लाख 67 हजार 629 खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आणि कर्जमुक्ती योजनेचा फायदा घेतला, मात्र उर्वरित 3995 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण आजही बाकी आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांसाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये अनेक लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत किंवा मृत्यू पावले आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी, आपले सरकार केंद्रा मार्फत शासनाकडे आपले नाव नोंदवून देखील या कर्जमुक्ती योजनेचा फायदा मिळू शकतात.

*आजची परिस्थिती*

आत्तापर्यंत बँकांनी शासनाकडे पुरवलेल्या खातेदारांची संख्या एक लाख 85 हजार 231 त्यापैकी विशिष्ट क्रमांकासह तयार झालेली यादी एक लाख 71 हजार 625, आधार प्रमाणीकरण झालेली खाती एक लाख 67 हजार 718, आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेली खाती 3906. दरम्यान आधार प्रमाणीकरण झालेल्या एक लाख 67 हजार 718 खातेदारांपैकी एक लाख 65 हजार 161 खातेदारांना लाभाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
-दिलीप पोहनेरकर
edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button