बाल विश्व

रोजगार निर्मिती देणारे उद्योग उभारावेत- पालकमंत्री राजेश टोपे

जालना-मराठवाड्यातील आठही जिल्हे अविकसित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा अविकसित भाग म्हणून गणला जातो. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे असेल तर मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर भर द्यावा लागेल, त्याच सोबत मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि जालना या भागात काही उद्योग,कारखाने आहेत, असेच उद्योग मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उभे करणे गरजेचे आहे त्यामुळे उद्योजकांनी मराठवाड्यामध्ये रोजगार निर्मितीचे उद्योग उभारावेत असे आवाहन जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते.मराठवाडा मुक्ति दिनाच्या शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर . यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-दिलीप पोहनेरकर 9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Check Also
Close
Back to top button