Advertisment
Breaking NewsJalna Districtजालना जिल्हाराज्य

‘जल “बिन” जीवन’ मिशनच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त

जालना- भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन 2019 मध्ये जल जीवन मिशन योजना सुरू केली आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज 55 लिटर नळाचे पाणी नियमित पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते . जालना जिल्ह्यात एकूण 733 योजना मंजूर होत्या परंतु आत्तापर्यंत केवळ 288 योजना पूर्ण झाल्याचा अहवाल जल जीवन मिशन कार्यालय म्हणजेच जालना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. खरंतर हा या कार्यालयाने दिलेला आकडा आहे. परंतु प्रत्यक्षात किती योजना सुरू आहेत याबद्दल मात्र शंका उत्पन्न होत आहे. कारण बदनापूर आणि अंबड या दोन तालुक्यांमध्ये म्हणजेच बदनापूर विधानसभा मतदारसंघात या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार नारायण कुचे यांनी स्वतःच केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत लगेच चौकशीसाठी त्रिसदस्य समिती देखील नियुक्ती केली आहे.

 

आमदार नारायण कुचे यांनी दिनांक 27 मार्च 2025 ला जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती आणि बदनापूर -अंबड तालुक्यांमध्ये एकाच गुत्तेदाराला 25 -25, 30-30 कामे दिले असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. अंबड तालुक्यात 138 योजना मंजूर आहेत तर बदनापूर मध्ये 81 योजना मंजूर आहेत. त्यामुळे एकाच कॉन्ट्रॅक्टदाराला एवढी कामे कशी? असा प्रश्न उपस्थित करून या सर्व कामाची चौकशी करावी अशी मागणी आमदार कुचे यांनी केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत या कामांची चौकशी करण्यासाठी दिनांक 28 मार्च रोजी त्रिसदस्य समिती नियुक्ती केली आहे या समितीचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तर सदस्य म्हणून प्रकल्प संचालक जलजीवन मिशन आणि लेखाधिकारी समग्र शिक्षा अभियान यांचा आहे. पंधरा दिवसांमध्ये या चौकशी समितीला अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे जलजीवन मिशन हे जलजीवन मिशन नसून ‘जल “बिन” मिशन’ अशी परिस्थिती झाली आहे.

जालना जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातच कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनाला पार्टी तर आहे परंतु दार मात्र कायमस्वरूपी बंद आहे आणि तुटलेल्या फर्निचरचा दारा समोर ढीग आहे .याउलट दुसऱ्या दारातून कार्यालयात प्रवेश आहे आणि इथे मात्र वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पाट्या झळकत आहेत .त्यामुळेच की काय बाहेरून येणाऱ्या आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांना देखील येथील कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याचा मोह सुटत नाही. अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराचा प्रचंड संताप आहे, परंतु वरिष्ठच याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अधिकारी निमुटपणे खुर्चीत बसलेल्या या माजी सदस्यांसमोर उभे राहून काम करत असतानाचे चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे जल जीवन मिशनचा बाहेर तर गोंधळ आहेच परंतु कार्यालयात देखील “आओ जावो घर तुम्हारा” अशी परिस्थिती आहे.

जल “बिन” मिशनच्या कामाची आजची परिस्थिती एकूण सहा तालुके 733 गावे 507 कोटी 73 लाख रुपयांचा निधी आणि 288 योजना पूर्ण. पूर्ण झालेल्या योजनांमध्ये अंबड तालुक्यातील 61, बदनापूर मध्ये 23 ,भोकरदन मध्ये 71, घनसावंगी 40, जाफराबाद मध्ये 48, आणि जालन्यात 45. 2024 ला जनतेच्या दारात असलेल्या नळात पाणी येणार होतं परंतु 2025 उजडले तरी नळाला तर पाणी आलेच नाही डोळ्यात मात्र आता पाणी यायला लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button