जालना जिल्हा

प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

जालना-जालन्यात प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठीच्या जागेची पहाणी व ईतर अनुषंगिक बाबींची शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पडताळणी केली. त्या नंतर या समितीने महाविद्यालयाच्या उभारणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चर्चाही केली.

   समितीमध्ये वैद्यकीय व शिक्षण व संशोधन विभाग, मुंबईचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयाच्या  माजी अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर, नंदुरबार शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे,वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे कार्यकारी अधिकारी  डॉ. राकेश वाघमारे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सल्लागार बाला सुब्रमन्यम, कायदेशीर सल्लागार चिन्मय जैन यांचा समावेश आहे.

                या समितीने प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, जालना व स्त्री रुग्णालय, जालना या ठिकाणी भेट देऊन या दोनही रुग्णालयाची पहाणी केली तसेच मागील तीन वर्षाच्या कामकाजाची माहिती संकलित करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या समवेत प्रत्यक्ष चर्चाही केली.

                यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल आनेराव, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. एस. पाटील, तहसिलदार श्रीकांत भुजबळ आदींची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.