जालना जिल्हा

कंगना वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- सुरेश गवळी

जालना- प्रसिद्ध तथा वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत तिने एका दूरचित्रवाणी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशा बद्दल अपशब्द वापरले आहेत. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले असताना देखील ते भीक म्हणून मिळाले होते, मात्र खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले आहे असे तिने या मुलाखतीत म्हटले आहे .त्यामुळे ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान केले ,प्राणांची आहुती दिली त्यांचा हा घोर अपमान आहे त्यामुळे कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि शासनाने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा अशी मागणी जाफराबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश गवळी यांनी केली आहे .

जाफराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली. तसेच हा गुन्हा दाखल न झाल्यास आपण पोलीस अधीक्षक आणि त्यानंतरही नाही झाला तर न्यायालयात जाऊन दाद मागू आणि गुन्हा दाखल करायला भाग पाडू असेही सुरेश गवळी यांनी म्हटले आहे.
-दिलीप पोहनेरकर,
9422219172,डाउनलोड
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.