Jalna Districtजालना जिल्हा

अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण.

जालना- शाळेत गेलेल्या मुलीचे पोट दुखत आहे असे सांगून या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पैठण येथील एका तरुणाविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूतन वसाहत परिसरात असलेल्या भीमनगर भागातील एक 14 वर्षाची विद्यार्थिनी विद्युत नगर, रेल्वे स्टेशन परिसरात  असलेल्या एक  इंग्लिश शाळेत शिकत आहे. मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे राहणारा अजय राजू गायकवाड हा तरुण शाळेत आला आणि शिक्षकांना या मुलीच्या पोटात दुखत आहे तिला दवाखान्यात घेऊन जायचा आहे असे खोटे सांगून शाळेतून घेऊन गेला. तसेच या मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याची शक्यता मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत वर्तविली आहे. दरम्यान कदीम जालना पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजय राजू गायकवाड विरुद्ध शाळेच्या प्रवेशद्वारातून मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे .अद्याप पर्यंत आरोपी अटक नाही पुढील तपास कदीम जालना पोलिस करीत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.