Advertisment
Breaking NewsJalna Districtजालना जिल्हा

जालना मनपा बाप्पाला आणि देवीला पावली!; यावर्षी नवीन हौदात होणार विसर्जन

जालना- नागरी समस्या संदर्भात भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणणारी जालना शहर महानगरपालिका मात्र गणपती बाप्पा आणि दुर्गा देवीला पावली आहे. विसर्जनादरम्यान या मूर्तींची होणारी अवहेलना टाळून त्यांचे पवित्र राखण्यासाठी यावर्षी दोन्ही देवतांचे विसर्जन नवीन बांधण्यात येत असलेल्या हौदामध्ये होणार आहे. असे आश्वासन नव्हे तर खात्री जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

जुना जालना भागात असलेल्या मोती तलावामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन आणि दुर्गा देवीचे विसर्जन केल्या जाते .जालना शहरालगतच असलेल्या या तलावाच्या काठावर मोतीबाग नावाने जालनेकरांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाणही आहे. याच तलावातील अवघे दोन टक्के भाग या विसर्जन हौदासाठी वापरण्यात येणार आहे.  विसर्जन झाल्यानंतर याच ठिकाणी जालनेकरांसाठी आकर्षक विद्युत रोषणाई असलेले कारंजे देखील पाहायला मिळणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना आमदार खोतकर म्हणाले,  “केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे 11 कोटींचा हा प्रकल्प असून मे 2025 पर्यंतच पूर्ण व्हायला पाहिजे होता परंतु त्याला मुदतवाढ देऊन गणपती विसर्जनापूर्वी हा पूर्ण केल्या जाणार आहे. साडेतीन कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता या हौदाची आहे. हौदाच्या बाजूलाच घाटही बांधल्या जात आहे. गणपती विसर्जनासाठी क्रेनची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच नागरिकांना विसर्जनाच्या वेळी किंवा अन्य वेळी या ठिकाणी विरंगुळा म्हणून आल्यानंतर भरपूर मोकळी जागा ठेवण्यात आली आहे .प्रत्येकी 30 फूट रुंदीचे तीन घाट इथे बांधल्या जात आहेत .या घाटावर येण्यासाठी सर्व बाजूंनी कॉंक्रीटचे रस्ते केले  जात असून गणपती विसर्जन  कुंडाचा आकार हा 103 मीटर रुंद 75 मीटर लांब आणि सहा मीटर खोल असा असणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button