Jalna Districtजालना जिल्हा
बुधवारी जालन्यात कुस्त्यांची दंगल

जालना- जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त जालना शहरात दि.९ एप्रिल बुधवार रोजी दुपारी १ वाजता “जलसम्राट केसरी” कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून लाखो रुपयांची बक्षिसांची लयलूट केली जाणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खा.डॉ.कल्याण काळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे राहणार आहेत.तर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राकॉचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, प्रदेश सदस्य एकबाल पाशा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख,बंकटलाल यादव, पै. भरत मेकाले, हंसराज डोंगरे, कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य दयानंद भक्त, युवा नेते अक्षय गोरंटयाल,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे,काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे बदर चाऊस, शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुनील खरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, माजी सभापती महावीर ढक्का,व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी,दीपक भुरेवाल, घनशाम खाकीवाले,बाबुराव मामा सतकर, राकॉचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, कुस्ती संघाचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत,शिवाजी शेजुळ,कुंदन काठोठीवाले, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा नंदाताई पवार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.जालना शहर व जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा,कैलास गोरंटयाल मित्रमंडळ आणि आयोजन समितीने केले आहे.

नामवंत मल्लांचा करणार सत्कार
या प्रसंगी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल करणाऱ्या नामवंत मल्लांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने या वर्षाचे महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके,डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे,पंजाब केसरी शेंडीकुमार, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील,हर्षवर्धन सदगीर,प्रशांत जगताप, सतपाल सोनटक्के यांचा समावेश आहे

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, -9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com