मराठवाडा

तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तंबूत घुसली जीप


वरुडी तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तंबूत जीप घुसली!

कोरोना काळात सुरू असलेल्या नाकाबंदी व विनापास प्रवास करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद-जालना सिमेवरील वरूडी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तंबूमध्ये शनिवार दिनांक 22 रोजी सकाळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो जीप घुसून तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले तर आरोग्य कर्मचारी बालबाल बचावले.

प्रशासनाचे कोरोना ब्रेक द चेन या उपक्रमांतर्गत निर्बंध लागू केल्यानंतर औरंगाबाद व जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या वरुडी फाट्याजवळ पोलीस चेक पोस्ट सुरू करण्यात आलेले आहे या ठिकाणी वाहने थांबवून पोलीस येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ई पास आहे किंवा कसे तपासणी करतात. दररोज प्रमाणे या ठिकाणी पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना आज सकाळी (22 मे ) या चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी गजानन जारवाल व चंद्रकांत लोखंडे, अमोल रगडेव आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे हे सकाळी 7 वाजता कर्तव्यावर असतांना अचानक औरंगाबादकडून जालनाकडे जाणारी बोलेरो (क्रमांक एमएच 42 एएक्स 1687) चेकपोस्ट येथे असलेल्या पेंडॉलमध्ये घुसल्याने पोलिस कर्मचारी गजानन जारवाल यांना जोराचा मार लागून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला तर गृहरक्षक दलाचे जवान चंद्रकांत लोखंडे, अमोल रगडे हे जखमी झाले तर आरोग्य कर्मचारी के. व्ही.मोरे हे बालंबाल बचावले. जखमींना तात्काळ येथीलच अलनूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी पोलिस कर्मचारी गजानन जारवाल यांच्या हात फ्रॅक्चर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले. सदरील चार ही कर्मचारी रात्रीच्या शिफटमध्ये सदरील चेक पोस्टवर कर्तव्य बजावत होते. सकाळी ८ वाजता त्यांची शिफट संपणार होती, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या चेकपोस्टवर लावलेल्या बॅरिकेटस रात्रीच्या अंधारात चमकत नसल्यामुळे व वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळै सदरील अपघात घडला असावा. बोलेरोचालक वाहन सोडून पळून गेला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही अशी माहिती बदनापूर ठाण्यातील पोलीस कर्मचारी चरणसिंग बमनावत यांनी दिली.

Related Articles