Jalna Districtराज्य

किरीट सोमय्या जालन्यात दिवसभर घेणार विविध कार्यालयातील माहिती

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर विविध आरोप करून त्याची शहानिशा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या जालन्यात आले आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयात यांनी भेट देऊन साखर कारखान्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्री विषयी माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली आहे. आज दिवसभर ते जालना शहरात तळ ठोकून आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पूर्वीचा जालना सहकारी साखर कारखाना येथेही भेट देणार आहेत.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२

मुख पृष्ठ


डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.