राज्य

निझामाबाद-पंढरपूर आणि निझामाबाद-पुणे या दोन अनारक्षित गाड्या सुरु

जालना-मध्य रेल्वे ने निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद हि अनारक्षित गाडी आणि निझामाबाद – पुणे आणि दौंड-निझामाबाद हि अनारक्षित गाडी पुन्हा सुरु करण्याचे घोषित केले आहे ते पुढील प्रमाणे : -1. गाडी संख्या ०१४१३ निझामाबाद ते पंढरपूर : हि गाडी निझामाबाद येथून दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी रोज दुपारी १३.२५ वाजता सुटेल आणि बासर, मुदखेड, नांदेड, परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.३० वाजता पोहोचेल.
2. गाडी संख्या ०१४१४ पंढरपूर ते निझामाबाद : हि गाडी पंढरपूर येथून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ पासून रोज सकाळी ०५.३० वाजता सुटेल आणि उस्मानाबाद, लातूर, परळी, परभणी, नांदेड, मुदखेड , बासर मार्गे निझामाबाद येथे रात्री २३.०५ वाजता पोहोचेल.
3. गाडी संख्या ०१४०९ दौंड ते निझामाबाद : हि गाडी दौंड रेल्वे स्थानकावरून दिनांक १५ नोव्हेंबर, २०२१ पासून रोज सायंकाळी १६.४५ वाजता सुटेल आणि अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, मार्गे निझामाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल.
4. गाडी संख्या ०१४१० निझामाबाद ते पुणे : हि गाडी निझामाबाद रेल्वे स्थानकावरून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ पासून रात्री २३.४० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव , अहेमदनगर, दौंड मार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री १९.०० वाजता पोहोचेल.
5. गाडी संख्या ०७५१५ बिदर ते नांदेड हि विशेष गाडी: दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी बिदर येथून सकाळी ०७.१५ वाजता सुटेल आणि उदगीर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १५.३० वाजता पोहोचेल.

दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.