वेगळी बातमी;मा.चोर साहेब नमस्कार….. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे एका वकिलाने चोरांसाठी घरांवर लिहून ठेवलेलं हे निवेदन!

जालना- सहा महिन्यांमध्ये एकदा नव्हे तर तीन वेळा झालेल्या चोऱ्यांमुळे जालना शहरातील एक वकील साहेब वैतागून गेले आहेत. खरं पाहता या वकिलाकडे चोरी होण्यासारखं काही नाही. वडिलोपार्जित वडिलांनी 1970 मध्ये बांधलेलं एक घर आहे. सध्या त्या घराची दुरुस्ती करणे गरजेच आहे परंतु ते देखील वकिलाकडून होत नाही. अशा या मध्यमवर्गीय वकिलाकडे सहा महिन्यापूर्वी पहिली मोठी चोरी झाली आणि त्यानंतर किरकोळ चोऱ्या झाल्या. जुना जालना भागात असलेल्या एसटी कॉलनीत राहणारे हे वकील महोदय आहेत ललित हट्टेकर.
एसटी कॉलनी च्या एका कोपऱ्याला त्यांचं घर आहे आणि पाठीमागे रेल्वेची हद्द, समोर ख्रिश्चन स्मशानभूमी आणि बाजूला मोकळा परिसर यामध्ये ते त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा राहतात, नुकतच त्यांच्या आईचं पण निधन झाला आहे. आईच्या निधनाच्या दुःखातच तीन चोऱ्यांना त्यांना सामोरे जावे लागल्यामुळे त्यांनी चोरांना सूचना, विनंती आणि धमकी अशा तिन्ही माध्यमातून एक निवेदन लिहून ठेवला आहे, जे की सध्या एक चर्चेचा विषय ठरला आहे. चोरांना जर आता चोरी करायचे असेल तर त्यांनी अगोदर हे निवेदन वाचावे आणि मग चोरी करावी असं ललित हट्टेकर यांना अपेक्षित आहे आणि फक्त अपेक्षितच आहे असं नाही तर हे निवेदन लावल्यानंतर चोरी झाली नाही, त्यामुळे चोरांवर या निवेदनाचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही ललित यांनी सांगितले आहे. काय आहे निवेदनात सविस्तर पाहण्यासाठी पहा वरील व्हिडिओ.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.