जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने घोटाळ्याची मालिका सुरू केल्यानंतर साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट ,या अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेनंतर आता आणखी एका अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेने दम तोडला आहे. ती म्हणजे स्नेहश्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुणे ,खरंतर 2015 मध्ये स्थापन झालेली ही सोसायटी 2019 मध्ये जालन्यातील संचालक मंडळाने हस्तांतरित करून घेतली दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी ठेवलेली गुंतवणूक वेळीच परत न करू शकल्यामुळे या संस्थेच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात दिनांक 16 फेब्रुवारी2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना नऊ तारखेला अटक केल्यानंतर उद्या पुन्हा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. दरम्यान सध्या अंबड आणि जालना येथील या शाखांना कुलूप आहे. आणि दोन्ही आरोपी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत.
दि.27 सप्टेंबर 2024 ची बातमी
घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील शेतकरी लक्ष्मण ठकाजी मंडलिक यांनी सन 2019 मध्ये टप्प्याटप्प्याने या संस्थेमध्ये 15 लाखांची गुंतवणूक केली होती. लक्ष्मण मंडलिक यांना त्यांची शेतजमीन पाझर तलावात गेल्यानंतर शासनाकडून आलेला मावेजा त्यांनी टप्प्याटप्प्याने स्नेह श्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह मध्ये गुंतविला होता. एकूण 15 लाख रुपयांच्या मुदत ठेवी त्यांनी ठेवल्या होत्या. त्यांच्या गरजेनुसार त्यांनी वारंवार या शाखेची संपर्क साधून रक्कम परत मागितली परंतु ती मिळाली नाही. शेवटी वसुलीसाठी जास्त तगादा लावल्यामुळे मंडलिक यांना सोसायटीने सीएसबी बँक जालना शाखेचे तीन पाच- पाच लाखाचे धनादेश दिले. त्यानुसार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी बँकेमध्ये टाकलेला धनादेश न वटताच तो परत आला. स्नेहश्रीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण दाखविण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाशी मंडलिक यांनी वारंवार संपर्क साधून या रकमेची मागणी केली. परंतु ती मिळाली नाही. शेवटी लक्ष्मण मंडलिक यांनी अंबड पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार नोंदविली .अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुरले यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि नऊ मे रोजी या प्रकरणातील स्नेहश्री चे अध्यक्ष शरद बाबुराव खोजे आणि काकासाहेब साहेबराव पितळे यांना अटक केली. या दोघांना अंबड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दिनांक 15 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सोमवारी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करीत आहेत.
पार्श्वभूमी स्नेहश्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फसवणूक झाल्याची अनेक ग्राहकांची तक्रार यापूर्वीच आलेली आहे .दरम्यान दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला जालना येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या शाखेसमोर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. त्यावेळी अंबडची देखील शाखा बंद होती. परंतु काही वकिलांच्या मध्यस्थीने या गुंतवणूकदाराचे पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच हे प्रकरण कदिम जालना पोलीस ठाण्यातही गेले होते परंतु तिथे कोणी लेखी तक्रार न दिल्यामुळे पुढील कारवाई झाली नाही .असे असताना येथील शाखेचे कर्मचारी वैभव जराड यांनी बँकेकडे 27 कोटींच्या ठेवी आहेत आणि कर्जवाटप 42 कोटींचे आहे त्यामुळे हे कर्ज वसूल करून ठेवीदारांची ठेवी परत करू असे म्हटले होते. तसेच पंधरा दिवसात नवीन संचालक मंडळ स्थापन होणार आहे त्यानंतर अशी अडचण येणार नाही असेही म्हटले होते. परंतु तसे न झाल्याने आता या संस्थेला कुलूप लागले आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, रवी गायकवाड, गजानन भोसले ,महिला पोलीस कर्मचारी निमा घनघाव, जया निकम वाहनचालक श्री .पाठक हे या तपासात सहभागी आहेत.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172