जालना- दिवसेंदिवस विभक्त होत जात असलेलं कुटुंब , त्यातून समोर येणाऱ्या समस्या, या समस्यांना तोंड देत परिवाराची जबाबदारी सांभाळत आणि आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाला कुठेही बाजूला न ठेवता त्या ज्ञानाच्या जोडीला अंगात असलेल्या कलेची जोड दिली तर एक अभियंता देखील उद्योजक होऊ शकतो. एवढंच नव्हे तर अभियंता याचा अर्थ असा आहे की त्याने उद्योजक घडवावेत किंवा उद्योजक व्हावं. अशीच एक अभियंता” कलाकार “उद्योजिका झाली आहे. प्राची पटवर्धन -जोशी.(pebble art)innori.
लग्नापूर्वी नोकरी करणं सोप आहे परंतु लग्न झाल्यानंतर परिवाराची जबाबदारी, मुलाबाळांची जबाबदारी सांभाळत असताना आजच्या विभक्त कुटुंबामध्ये मुलांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबा देखील सोबत नसतात. त्यामुळे अनेक वेळा आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाला मन मारून बाजूला सरकवावं लागतं .परंतु तसे केलेच पाहिजे असं काही नाही .याच ज्ञानाच्या जोडीला स्वतःच्या आवडीचे काम स्वतःच्या घरातून सुरू केलं तर निश्चितच या दोघांची सांगड घातल्यावर पुन्हा आपलं ज्ञान विकसित होतं ,हेच सांगितल आहे प्राचीने सद्य परिस्थितीमध्ये अनेक तरुण-तरुणी या दहा ते पाच या वेळेच्या कामात अडकून पडल्यामुळे ते वैतागले आहेत .त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळून देखील आपण नोकरी, व्यवसाय करू शकतो असं प्राचीचं मत आहे. त्यासाठी हवी आहे ती फक्त जिज्ञासू वृत्ती आणि ती असेल तर कोणतेही क्षेत्र महिलांसाठी कमी नाही असे तिचं म्हणणं आहे .
पेबल आर्ट(pebble art) म्हणजेच नदीकाठी असलेल्या गुळगुळीत दगडांवर कलाकुसर आणि रंगरंगोटी करून एक आकर्षक भेटवस्तू तयार करणे. प्राची पटवर्धन व्यवसाय हाच व्यवसाय करते. अभियांत्रिकीची नोकरी सोडल्यानंतर तिने स्वतःच्या कलागुणांना विकसित केलं आणि हा व्यवसाय सुरू केला. खरंतर या व्यवसायात गुंतवणूक जरी कमी असली तरी संकल्पनेला मोठा वाव आहे. त्यामुळे विविध संकल्पना राबवून ज्याप्रमाणे दगडाचा देव करतो ,त्याप्रमाणे या बारीक -बारीक खड्यांना आकर्षक रंग रंगोटी करून अनेकांच्या नावाच्या पाट्या, चिल्या पिल्लांना आवडणारी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी , किचैन, अशा एकना अनेक वस्तू या खड्यांपासून तयार केला जातात. याला शासन देखील सर्वतोपरी मदत करते. प्राचीने केलेल्या या कामाची सविस्तर माहिती पाहण्यासाठी वरील व्हिडिओ बघा.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172