जालना-महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिनांक 3 डिसेंबर 2024 ला एक परिपत्रक काढले आहे आणि त्यानुसार इंधनावर चालणाऱ्या वाहनांना किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या नंबरच्या वाहनांची 31 मार्च 2025 पूर्वी नंबर प्लेट बदलून घेणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनांची नोंदणी 31 मार्च 2019 पूर्वी झालेली आहे त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे ,कारण 31 मार्च 2019 नंतर घेतलेल्या वाहनांना ज्या विक्रेत्याकडून हे वाहन घेतले आहे त्यांच्याकडूनच या नंबर प्लेट बसून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची अधिकृत फी त्या वाहन विक्रेत्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर 31 मार्च 2019 नंतर वाहन खरेदी केले असेल आणि तुम्हाला जर एच. एस. आर. पी.(HSRP) म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दिली नसेल तर तुम्ही त्या विक्रेत्याकडून ही प्लेट अधिकृतपणे घेऊ शकता.
वाहन चालकांना आता एकच पर्याय राहिलेला आहे तो म्हणजे एक तर नंबर प्लेट बदलणे किंवा वाहनच बदलून टाकणे. वाहन जरी बदलले तरी घेणाऱ्या व्यक्तीला या बदलाचा सामना करावाच लागणार आहे. नाही केला तर भुर्दंड मात्र चुकणार नाही. तुमच्या हातात अजून एक महिना आहे निर्णय तुमचा आहे. जर नंबर प्लेट बदलायची असेल तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुमच्या मदतीला आहेत .EDTV च्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी वाहनधारकांना सोपे व्हावे म्हणून या नंबर प्लेट कुठे? कशा? बदलून मिळतील कुठे नोंदणी करायची? याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण वरील व्हिडिओमध्ये देखील ती पाहू शकता. तसेच जालना जिल्ह्यासाठी या नंबर प्लेट कुठून बदलून मिळतील याविषयी देखील खाली माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये क्यू आर कोड सुद्धा आपणास उपलब्ध आहे.
HSRP FITMENT CENTER JALNA
Tirumala Steel In Side Bholeshor Nagar Near Next to HP Shantannu Petrol Pump ,Ambad Beed Road Indewadi,Indewadi Jalna
Incharge – Bhaurao Shilge
9265643420
DEALER FITMENT CENTER CONTACT PERSON DETAILS
1- PRIYANKA MOTORS,TEJAS DHOTRE
MO.9420460999
2- BALIRAJA E BIKE SOLUTION,Rahul Kolhe,Mo.8999749998
3- Maharashtra Tractors Sales And Services,Abid Shaikh Mo.9209347043
4- Laxmi Tractors And Impliments Mukund Pavar,.9770080080
5- Kirti ENTERPRISES Raj Shah
Mo.8080972101,8055555114
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.