जालना- शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोषागार किंवा ट्रेझरी(treasury office) या शब्दाशी किंवा या कार्यालयाशी सामान्य माणसाला काहीच देणे घेणे नाही किंवा याचा संबंधही येत नाही. परंतु शासनाची तिजोरी म्हणून देखील या कार्यालयाकडे पाहिले जाते. शासनाच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशोब इथे असतो, म्हणूनच की काय कोष म्हणजे पैसा आणि आगार म्हणजे भांडार त्यामुळे पैशाचे भांडार म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशा या कोषागाराचे काम चालते कसे ?त्याची निर्मिती कधी झाली? आर्थिक व्यवहाराशिवाय इतर काय व्यवहार येथे केले जातात? या सर्वांविषयी माहिती देत आहेत मुरारीलाल जगन्नाथ सारस्वत .जालना जिल्ह्यात कोषागार निर्मिती झाली ती जिल्ह्याच्या निर्मिती सोबतच म्हणजे 1 मे 1981 ला. त्यावेळ पासूनची कोषागारची वाटचाल सांगणारे तत्कालीन अकरावीच्या आधारावर लिपिक म्हणून 225 महिना पगार घेणारे आणि 13 जानेवारी 1971 ला या सेवेत, एवढेच नव्हे तर नोकरी लागण्यासाठी कोणते तीन एल(L) आवश्यक आहेत याचे देखील गुपित EDTV NEWS च्या वाचकांसाठी उलगडले आहे मुरारीलाल सारस्वत यांनी.
तुम्हाला माहित आहे का ? कुठे होते हे कोषागार कार्यालय ,जुन्या जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये हे कोषागार कार्यालय होते. त्यानंतर हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर इथे तालुका पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले. या पोलीस ठाण्याचे देखील स्थलांतर झाले आणि आता सध्या ही इमारत भग्न अवस्थेत आहे. या कोषागार कार्यालयाने अनेक आमदार खासदारांचे बॅलेट पेपर पाहिलेले आहेत ,अनेकांना लॉटरीच्या माध्यमातून आर्थिक लाभ ही दिलेला आहे ,एवढेच नव्हे तर घरोघरी पाठविल्या जाणाऱ्या पोस्टाची तिकिटे आणि मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी लागणारे बॉण्ड देखील इथेच ठेवले जात होते. सरकारी कार्यालयांचे खर्च त्यांचे पगार बिले याच कार्यालयातून मंजूर होत होते त्यामुळे या कार्यालयात शिपायापासून कोषागार अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा थाट काही वेगळाच होता. असे या महत्त्वाच्या परंतु सामान्य माणसाला ओळख नसलेल्या या कार्यालयाची माहिती आणि आठवणी एक जुने अधिकारी म्हणून मुरारीलाल सारस्वत सांगत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172