जालना– एज्युकेशन फाउंडेशन (JEF)च्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 305 विद्यार्थ्यांना 33 लाख 17 हजार रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली होती. हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळाआज रविवार दि. 22 डिसेंबर रोजी श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून निर्माण युवा उपक्रम व सर्च फाउंडेशन गडचिरोलीचे सहसंचालक अमृत अभय बंग तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती.तसेच व्यासपीठावर कृषी भूषण विजयअण्णा बोराडे, प्रा. सुरेश लाहोटी, उद्योजक सुनील रायठा यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते अमृत बंग आणि डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलेले मार्गदर्शन ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
दुर्बल घटकातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड आर्थिक अडचण येऊ नये म्हणून गेल्या 4 वर्षापासून जेईएफ शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पहिल्यावर्षी 124 विद्यार्थ्यांना 17 लाख 25 हजार रुपये, दुसऱ्या वर्ष 190 विद्यार्थ्यांना 26 लाख 11 हजार 351 रुपये, तिसऱ्यावर्षी 271 विद्यार्थ्यांना 31 लाख 17 हजार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावर्षी 305 विद्यार्थ्यांना 33 लाख 17 हजार रुपयाची शिष्यवृत्ती येत्या रविवारी प्रदान करण्यात येत आहे. चार वर्षात 900 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 1 कोटी 15 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून, महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर राबवली जाणारी ही सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना ठरत असून, दानदात्यांच्या योगदानामुळे प्रत्येकवर्षी या योजनेचा विस्तार होत चालला आहे. यावर्षी पॉलिटेक्निकच्या 252, इंजिनिअरिंगच्या 13, एमबीबीएसच्या 3, बीएससी नर्सिंगच्या 8, बी. फार्मसीच्या 2, कॉमर्सच्या 11, बीएससी ऍग्रीच्या 4 तर स्टाफच्या विविध अभ्यासक्रमाचे पाल्य अशा 12 जणांची शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्यात आली. शिष्यवृत्तीची रक्कम अभ्यासक्रमानुसार 10 हजार ते 25 हजारापर्यंत आहे. गेल्या 4 वर्षात 900 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. जालना शहरातील दानशुरांच्या आर्थिक सहयोगामुळे हा उपक्रम सुरू आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172