जालना- जालना जिल्ह्यातील नागरिकांना मान खाली घालण्यासाठी नव्हे तर त्यांची मान उंचावेल, त्यासोबत पालकमंत्री पदाचीही मान उंचावेल असंच काम आपण करू .अशी ग्वाही जालन्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली .
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य ध्वजारोहण श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच जालन्यात आल्या होत्या. पोलीस प्रशासनाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्रीमती मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
जालना जिल्ह्यातल्या विकासासंदर्भात श्रीमती पंकजा मुंडे यांनी शहरात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. त्यासोबत भविष्यामध्ये विविध उपक्रम सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन राबविण्यात जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172