जालना- ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दिनांक 20 जुलै 2000 पासून अस्तित्वात आला आहे .ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम आठ नुसार ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा स्थापन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत त्यानुसार दिनांक 18 फेब्रुवारी 2022 च्या अधिसूचनेवरून महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम- 2022 तयार करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण परिषदांवर शासकीय .शासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर-पालवे यांनी दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी या नियुक्त केल्या आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे शासकीय पदाधिकारी अध्यक्ष- जिल्हाधिकारी, उपाध्यक्ष -अप्पर जिल्हाधिकारी, तर सदस्य म्हणून पोलीस अधीक्षक ,उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन ,कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी ,जिल्हा कृषी अधिक्षक, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे आहेत अशासकीय सदस्य. ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सर्वश्री नंदकुमार मधुकरराव देशपांडे, अहमदनुर शेख मोहम्मद शरीफ ,दिलीप वसंतराव लाड, श्रीमती शालिनी अरुण पुराणिक, बाबासाहेब सोनटक्के, अनंत रामेश्वर वाघमारे ,संजय प्रभाकर देशपांडे, मोहन सखाराम इंगळे, रमेश गणपत तारगे, बालाप्रसाद रामप्रसाद जेथलिया ,मधुकर गजानन सोनवणे, पेट्रोल व गॅस विक्रेते संदीप मोतीलाल काबरा, व्यापार व उद्योग विजय दिगंबर जाधव ,सतीश सिताराम पंच ,वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी डॉ .स्वप्निल भगवानदास मंत्री, शेतकरी प्रतिनिधी अनिल हरिनारायण मुंदडा ,जुमानबीन नासेर चाऊस आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य म्हणून दिनेश रामबिलास होलानी परतुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांपर्यंत या नियुक्त्या कायम राहणार आहेत.——–
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172