जालना -बारावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रमासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत जे.ई.एस. महाविद्यालयातून विज्ञान शाखेत ३०८ विद्यार्थी बसलेले होते. यापैकी २९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विज्ञान शाखेचा निकाल ९४.८० टक्के लागला आहे. त्यापैकी ३२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि’ द्वितीय श्रेणीत १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गुणानुक्रमे विद्यार्थी व त्यांना मिळालेले एकूण गुण व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व प्रथम कु. सेजल संजय कुलकर्णी हिला ५२९ गुण ८८.१७%, द्वितीय कु.अनुश्री अरविंद महाजन ५२० गुण ८७.६७%, तृतीय कु. साक्षी लक्ष्मण काटे ५२३ गुण ८७.१७% प्राप्त झाले. वाणिज्य शाखेमध्ये कुमारी अक्षरा शैलेश चौधरी या विद्यार्थिनीने बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत.
वाणिज्य शाखेत ३१३ विद्यार्थी बसलेले होते. यापैकी २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४१ टक्के लागला आहे. त्यापैकी ८६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि द्वितीय श्रेणीत ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी व त्यांना मिळालेले एकूण गुण व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व प्रथम अभिषचंद्र श्रेयांस हिरप याला ५७० गुण ९५.००%, द्वितीय कु.अक्षरा शैलेश चौधरी ५६८ गुण ९४.६७% व तृतीय कु. सिद्धी जयप्रकाश साबु ५६७ गुण ९४.५०% प्राप्त झाले.
कला शाखेत १२५ विद्यार्थी बसलेले होते. यापैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कला शाखेचा निकाल ५८.४० टक्के लागला आहे. त्यापैकी २ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि द्वितीय श्रेणीत ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी व त्यांना मिळालेले एकूण गुण व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व प्रथम कु. वैष्णवी शिवाजी नन्नवरे हिला ४९६ गुण ८२.६७%, शेख अलिम सलिम ४५२ गुण ७५.३३% व तृतीय कु. प्रियंका पवन शर्मा ४३४ गुण ७२.३३% प्राप्त झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, कोषाध्यक्ष हेमेंद्र लखोटिया, संचालक पन्नालाल बगडिया, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य श्री. पी. सी. बाफना, पर्यवेक्षक श्री. एस. बी. बिक्कड, पर्यवेक्षिका श्रीमती के. के. वासनिक तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172