भोकरदन -भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवर बुधवार दिनांक सतरा रोजी गावातील हनुमान मंदिरासमोर दगडफेक करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गावातील हनुमान मंदिरासमोरून मिरवणूक सुरू झाली होती. अहिल्याबाई होळकर चौक, टिपू सुलतान चौक, बस स्थानक आणि अन्य काही मार्गावरून फिरून ही मिरवणूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा हनुमान मंदिरासमोर आली यावेळी. आरती सुरू असतानाच दगडफेक सुरू झाली. टिपू सुलतान चौकामध्ये मोठ्या आवाजात डीजे लावून गाणे का वाजवले ?असे म्हणत ही दगडफेक सुरू झाली. दरम्यान या संदर्भात बाळू लक्ष्मण शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुक्तार जब्बार शेख आणि अन्य 28 जण अशा एकूण 29 मुस्लिम समाजाच्या ग्रामस्थांवर भादवि कलम 143 147 149 अन्वये पहाटे साडेतीन वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान सरकारच्या वतीने भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पिंपळकर यांनी दिलेल्या तक्रारीत, आरोपी लक्ष्मण शेळके यांच्यासह 18 ग्रामस्थांविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमून श्रीराम नवमीच्या मिरवणुकीला परवानगी न घेता डीजे वाजवणे आणि ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडफेकी मध्ये कैलास शामराव घोलप आणि बाळू लक्ष्मण शेळके हे जखमी झाले आहेत .त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन्ही गटांच्या तक्रारीनंतर गावामध्ये शांतता समितीची बैठक पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. तूर्तास तडेगाव मध्ये शांतताआहे. आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172