Talukaजालना जिल्हा

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सादर करा- ना.सत्तार

बदनापूर, -तालुक्यातील रोशनगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेआहे.  या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी म्हणून पंचनामे आवश्यक आहे व संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून शासनााला सादर करावेत, एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, अंबडगाव, रोषणगाव, नानेगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी  ना. अब्दुल सत्तार यांनी केली. यावेळी सोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर ,आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भगवान कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी  उपस्थित होते.

यावेळी  ना. अब्दुल सत्तार यांना आमदार नारायण कुचे व माजी आमदार संतोष सांबरे यांनी मराठवाड्यासह बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघात सप्टेंबर महिन्यामध्ये सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेताला तळ्याचे स्वरूप येऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, यामध्ये कापूस, सोयाबीन, मका, मिरची, ऊस हे पिक पूर्णपणे जमीनदोस्त होऊन नष्ट झाले आहे, तर डाळिंब, मोसंबी यासह अनेक फळबागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे, त्याचबरोबर जनावरे वाहून त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तसेच काही भागामध्ये अतिवृष्टीच्या पावसाने घराच्या भिंती पडल्या आहेत, यासर्व नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा प्रसंगी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले.

ना.सत्तार यांनी तालुक्यातील धोपटेश्वर शिवारातील रमेश कोल्हे या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली .तदनंतर अंबडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.  यावेळी सरपंच राजेंद्र जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, जयप्रकाश चव्हाण, अमोल चव्हाण आदीसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तदनंतर त्यांनी नानेगाव व रोशनगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देऊन पाहणी केली.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button