धाराशिव- जुन्या मैत्रिणीच्या माध्यमातून नवीन महिलेला जाळ्यात ओढणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याचे झाले असे की ,सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या ३८ वर्षीय फिर्यादी महिलेचे माहेर बीड आहे. तिच्या बीडमधील एका मैत्रिणीने या फिर्यादी महिलेशी संपर्क साधून तिला गोड बोलून कारने भूममध्ये नेले , तिथं गेल्यावर तिला समजले की, वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे हे तिचे खास मित्र आहेत. तिच्या माध्यमातून महिलांवर जाळे टाकून प्रेमसंबंध निर्माण करून शारीरिक उपभोग करतात. बीड येथील या महिलेने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याला भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये बोलावले. त्यानंतर रवींद्र शिंदे याने तक्रारदार महिलेला बेडरूममध्ये सोबत झोपण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तिने नकार दिला, नंतर दुसऱ्या दिवशी आय लव्ह यु म्हणत तिला जवळ ओढून तिच्या अंगाशी झटण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित महिलेने कसाबसात तेथून पळ काढला.
हा प्रकार ५ जून २०२४ रोजी घडला आणि गुन्हा २२ जून रोजी दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे, त्याची मैत्रिण सुनीता गोविंद मस्के आणि चालक प्रदीप या तिघांवर भूम पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३५४, ३५४ ( A ) , ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांचे हे एकतर्फी प्रेम प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. गेल्या 17 दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा जोरदार प्रयत्न झाला परंतु फिर्यादी महिलेने कुठल्याही प्रकारची तडजोड न केल्यामुळे हे प्रकार उघडकीस आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172