जालना- सर्व देश एकीकडे दिवाळी साजरी करीत असताना जालना तालुक्यातील मौजे वाघरूळ अंगणवाडी क्रमांक एक येथील पोषण आहारामध्ये लाभार्थ्याला किडके वाटाणे देण्यात आले होते . यासंदर्भात ईडी टीव्ही ने दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी” दिवाळीनिमित्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना खिडक्या धान्याचा मेनू” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती.
हे असे वाटाणे होते की त्याला जनावरांनी देखील खाल्ले नाही. यासंदर्भात लाभार्थ्याचे पालक श्रीराम मुंडलिक यांनी थेट जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. आणि त्यानंतर नवीनच बदलून आलेल्या महिला व बालकल्यांनच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती कोमल कोरे चाटे यांच्यासमोर हे प्रकरण आले. परंतु प्रस्थापित कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आणि पर्यवेक्षिकेसह अंगणवाडी सेविकेला एक थातूरमातूर नोटीस बजावून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु EDTV NEWS ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर बीटपरिवेक्षिकेला पंचनामा करायला सांगितला. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या पंचनामावर बळजबरीने सह्या घेण्यात आल्या होत्या. ही बळजबरी पुन्हा एकदा श्रीमती चाटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रकरणात लक्ष घातले आणि हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यापर्यंत पोहोचले. या प्रकरणाच्या पाठपुराव्यामुळे त्यांना देखील शेवटचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे वाघरूळ येथील अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता विश्वनाथ रकटे यांना शासन निर्णय क्रमांक एम बी 2006, दिनांक 12 एप्रिल 2007 मधील तरतुदीनुसार कामामध्ये सुधारणा करण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे. संधी देऊनही कामात सुधारणा झाली नाही तर मानधनी सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले आहे.
दिनांक 20 ऑक्टोबर 2022 ची बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
दिवाळीनिमित्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना कीडक्या धान्याचा” मेनू”
दिवाळीनिमित्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना कीडक्या धान्याचा” मेनू”
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com