जालना – महावीर स्थानकव जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या शिक्षकांच्या तीढ्या संदर्भात सविस्तर बातमी वाचली. संस्थेने वारंवार या या शिक्षकावर वरदहस्तच ठेवला परंतु शिक्षकाच्या विरोधात असलेल्या तक्रारी आणि शिक्षकाने स्वतः केलेल्या चुका यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी लगाम लावला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये पुन्हा संस्थेने या शिक्षकांबद्दल काय म्हटले आहे तेही पाहूयात.
या शाळेचे सहशिक्षक प्रदीप विश्वनाथ राठोड यांना यापूर्वी एकदा सेवा मुक्त केले आणि पुन्हा घेतले. घेताना विनाअनुदानित शाळेतून शंभर टक्के अनुदान शाळेवर घेतले त्यानंतर पुन्हा याच शिक्षकाला मुख्याध्यापक शांतीलाल वानगोता यांनी पत्र क्रमांक 63 /2022-23 दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पुन्हा सेवामुक्त केले या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जालना यांचे पत्र क्रमांक 13 / 2022 -23 दिनांक 13.1.2023 या पत्राचा संदर्भ घेऊन मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी पत्र काढले आणि प्रदीप राठोड यांना कळविले की, श्री.म.स्था . जैन माध्यमिक विद्यालयास शासनाच्या निर्णय क्रमांक 2012 दिनांक 16 ऑगस्ट 2012 या आदेशानुसार व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या जावक क्रमांक 2012- 13 दिनांक 11 नोव्हेंबर 2012 नुसार इयत्ता सातवी ते दहावी साठी विनाअनुदान तत्त्वावर आठ तुकड्या मंजूर झालेल्या होत्या .त्या विना अनुदान तुकड्यावर आपली नियुक्ती केली होती. शाळेला कुठल्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न नाही ,त्यामुळे विनाअनुदानित तुकड्या चालवणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही त्यामुळे सदरील विनाअनुदानित तुकड्या शैक्षणिक वर्ष 2022- 23 पासून बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. आपली नेमणूक विनाअनुदानित तुकड्यावर असल्यामुळे व त्या विनाअनुदानित तुकड्या शैक्षणिक वर्ष 2022- 23 पासून बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतल्यामुळे आपली ज्या पदावर नियुक्ती झाली ते पद दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी संपुष्टात आले आहे. त्यामुळे ते पदच आता अस्तित्वात नसल्याने दिनांक 14 जानेवारी 2023 पासून आपली सेवा समाप्त करण्यात येत आहे. ज्या शिक्षकाची सेवा समाप्त झाली तोच शिक्षक जालना जिल्हा परिषदेसमोर दिनांक सात जून पासून उपोषणाला बसला होता. दरम्यान या पत्रासंदर्भात शिक्षक प्रदीप राठोड यांना विचारले असता मला हे पत्रच मिळाले नाही असे त्यांनी सांगितले ,परंतु प्रत्यक्षात शाळेच्या रजिस्टरवर हे पत्र मिळालयाची प्रदीप राठोड यांनी सही केलेली आहे.
13 जानेवारी 2023 रोजी सेवामुक्त केलेल्या या शिक्षकाला संस्थेने पुन्हा शंभर टक्के अनुदानित पदावर रुजू करून घेतले आहे आणि ते देखील आठ महिने मागच्या तारखेमध्ये. संस्थेने दिनांक 12 जुलै 2023 रोजी मुख्याध्यापकांना पत्र काढून प्रदीप राठोड या शिक्षकाची विनाअनुदानित तुकडीवरून श्री.म.स्था. जैन माध्यमिक विद्यालयात शंभर टक्के अनुदानित रिक्त पदावर बदली करण्यासंदर्भात दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी विनंती अर्ज केला होता .त्या अर्जावर संस्थेने दिनांक 21 मे रोजी बैठकीत विचार विनिमय करून या शिक्षकाला विनाअनुदानित तुकडी करून शंभर टक्के अनुदानित पदावर रुजू करून घेण्याचा ठराव पारित केला. या अनुषंगाने प्रदीप राठोड यांना दिनांक एक नोव्हेंबर 2022 पासून शंभर टक्के अनुदानित पदावर बदली करून घ्यावी असे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत .ज्या शिक्षकाची सहा महिन्यापूर्वी सेवा समाप्ती करण्यात आली, जो शिक्षक विनाअनुदानित संस्थेत काम करत होता तोच शिक्षक सहा महिन्यांनी शंभर टक्के अनुदानित सेवेत गेला कसा? शासनाच्या नियमानुसार हे सेवा सातत्य नाही आणि जर सेवा सातत्य नसेल तर एकदम शंभर टक्के अनुदानित शाळेवर शिक्षकाची नियुक्ती करता येत नाही. त्यामुळे सहा महिन्यातच असं काय घडलं की ज्यामुळे संस्थाचालकांना आपलाच निर्णय फिरवावा लागला?
दरम्यान वर्षभराच्या काळामध्ये कोर्टकचेऱ्या, पत्रव्यवहार हे सर्व सुरूच होते .त्यानंतर संस्थेने दिनांक 4 जून 2024 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रदीप राठोड यांची विनाअनुदानित तुकडी वरून अनुदानित तुकडीवर बीएससी, बीएड या रिक्त असलेल्या पदावर एक नोव्हेंबर 2022 पासून 100% अनुदानावर बदली करण्यात आल्याचे पत्र दिले. तसेच संस्थेचे सचिव व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये तडजोड तडजोड झाली आहे संबंधित कर्मचारी आणि संस्था यांच्यामध्ये देखील न्यायालयात तडजोड झाले असून शिक्षक प्रदीप राठोड यांच्या एम एस सी पदवी आक्षेपा संदर्भात संस्थेने त्यांना क्षमापित केल्याचेही कळवले आणि त्यांची खंडित केलेली सेवा ग्राह्य धरू नये आणि वैयक्तिक मान्यता द्यावी अशी ही विनंती केली आहे.
4 जून चे हे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र लिहून दिनांक 12 सप्टेंबर 2023 च्या सुनावणीची आठवण करून दिली. तसेच शैक्षणिक वर्ष 2014- 15 ,16 -17 या कालावधीत नियमित सेवेत असताना अनाधिकृत, रित्या रजा न घेता कशाप्रकारे शिक्षण घेतले ही बाब संस्थेने न्यायालयाच्या व उपसंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी ,संबंधिताने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येत आहे, तसेच संस्थेने प्रदीप राठोड यांच्या संदर्भात कोणतेही प्रकरण न्याय प्रविष्ट नाही असे प्रमाणपत्र दिलेले आहे, परंतु प्रत्यक्षात चार याचिका दाखल आहेत आणि याच याचिकां संदर्भात सध्या परिस्थिती काय आहे हे देखील कळवलेले नाही, त्यामुळे सात जून पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणासाठी बसले बसणाऱ्या सहशिक्षक राठोड यांना आपल्या स्तरावरून उपोषणापासून परावृत्त असेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात संस्थेतीलच काही शिक्षकांनी बाहेरच्या निळकंठ माधवराव कुलकर्णी आणि विष्णू निवृत्ती कदम या व्यक्तींना हाताशी धरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना प्रदीप विश्वनाथ राठोड यांनी शासनाची फसवणूक केली आहे आणि त्यांची पदस्थापना रद्द करावी अशा आशयाची तक्रार द्यायला लावली. या तक्रारीच्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारदार, संस्थेचे प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक यांची दोन वेळा सुनावणी ठेवली होती जी काही ना काही कारणामुळे रद्द करण्यात आली. आणि तिसऱ्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये प्रदीप राठोड या सहशिक्षकाने शासनाची फसवणूक केल्यामुळे वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची शिफारस तसेच श्री. महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जालना येथील सदरील कालावधी सेवा खंड म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असा प्रस्ताव औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना पाठविला आहे . या प्रस्तावावर अजून पर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सहशिक्षक प्रदीप राठोड यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरून दिनांक सात जून पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते आणि वैयक्तिक मान्यता देण्याची मागणी केली होती. या मागणीला शिक्षणाधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले आणि संस्थेतील इतर शिक्षक प्रदीप राठोड यांचे विरोधात गेले होते त्यांनी न्यायालयात प्रकरण मागे घेतल्यानंतर देखील आता पुन्हा का तक्रार केली आहे हे पुढच्या भागात.—
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172