जालना- दिवसभराचे कामकाज आटोपून सोसायटी बंद करून घरी परतणाऱ्या सोसायटीच्या व्यवस्थापकाला देऊळगाव राजा घाटामध्ये लुटल्याची घटना काल दिनांक 21 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीचे अंबड शाखेचे व्यवस्थापक आनंद रघुवीर कुलकर्णी व 24 वर्षे हे सोसायटी बंद करून सायंकाळी त्यांच्या देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील घरी जात होते .दरम्यानच्या काळात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोंदेगाव शिवारातील व्यवहारी हॉटेलच्या घाटामध्ये अज्ञात 30ते40 वर्ष वयोगटाच्या तीन व्यक्तींनी आनंद कुलकर्णी यांची मोटरसायकल अडवली आणि कुलकर्णी यांना खाली पाडले. दुसऱ्याने त्यांच्या डोक्यात बांबूची काठी मारून त्यांना जखमी केले आणि या तिघांनी मिळून कुलकर्णी यांच्याकडे असलेला आठ हजार रुपयांचा जुना मोबाईल ,दोनशे रुपये किमतीची पाठीवरील बॅग ज्या बॅगमध्ये बँकेचे कागदपत्र पतसंस्थेची आणि इतर कार्यालयांची किल्ली होती, आणि पन्नास हजार रुपयांची जुनी एम एच 28 एसी 57 24 क्रमांकाची मोटरसायकल असा एकूण 58 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला .आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खाडे हे करीत आहेत.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972