बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथील शितल संतोष बर्डे ही बावीस वर्षीय विवाहिता धुणे धुण्यासाठी आज (दि. 24 एप्रिल) दुपारी 2 च्या सुमारास कचरू आनंदा बनसोडे यांच्या विहिरीवर गेली होती. सदरील विहीरीचे बांधकाम झालेले नसल्याने धुणे धुताना ती विहिरीत पडली. ही बातमी गावकऱ्यांना समजताच मोठया संख्येने मदतकार्य करण्यात आले तथापि, तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जवसगावचे सरपंच भरत गारखेडे यांनी दिली. या महिलेच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना
Previous Articleरिकामटेकड्या हजार लोकांमध्ये आढळले 27 कोरोना बाधित रुग्ण
Next Article 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर