जालना -शासनाच्या मतदार जनजागृतीचा परिणाम म्हणा किंवा तृतीय पंथीयांना देखील मतदानाचे समजलेले महत्त्व समजा, उत्तर काहीही असो परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदानासाठी पात्र ठरलेल्या तृतीयपंथीयांमध्ये 45 नव मतदारांची भर पडली आहे.
एक जानेवारी 2019 या अर्हता दिनांकवर आधारित मतदार संख्या 18 लाख 45 हजार 66 एवढी होती. त्यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख 77 हजार 749 ,स्त्री मतदार आठ लाख 65 हजार 337 ,सर्विस मतदार 1935 आणि तृतीयपंथी मतदार, फुलंब्री विधानसभा मतदारसंघांमध्ये चार आणि पैठण विधानसभा मतदारसंघात दोन असे एकूण सहा तृतीयपंथी मतदार 2019 मध्ये होते .
दरम्यान या तृतीय पंथीयांमध्ये झपाट्याने वाढ झाली असून 2024 मध्ये मतदान करणाऱ्या तृतीय पंथीयांमध्ये 51 एवढा आकडा झाला आहे. यावर्षी एकूण 19 लाख,36 हजार ,990 मतदार लोकसभेसाठी आपला हक्क बजावू शकतात त्यामध्ये पुरुष 10 लाख 18 हजार 251 ,स्त्री नऊ लाख 16 हजार 319 ,सर्विस मतदान 2 हजार 369 तर तृतीयपंथी मतदार 51 आहेत .या 51 तृतीय पंथीय मतदारांमध्ये जालना विधानसभा मतदारसंघात लक्षणीय वाढ झाली आहे .त्यामध्ये जालना 35, बदनापूर 4 ,सिल्लोड 3 ,फुलंब्री 5 ,आणि पैठण चार असे 51 तृतीयपंथी मतदार आहेत. जे मागच्या लोकसभेला फक्त सहा मतदार होते .यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघातून 18 ते 19 वयोगटातील देखील एक तृतीयपंथी मतदार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172