जालना-रोटरी क्लब जालन्याच्या वतीने मोफत जयपुर फूट कॅम्पच्या आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 23 आणि 24 असा हा दोन दिवस कॅम्प सुरू राहणार आहे .ज्या व्यक्तींचे पाय अधू आहेत अशा व्यक्तींच्या पायाचे माप घेतल्या जाणार आहे आणि पुढील महिनाभरामध्ये हे कृत्रिम पाय तयार करून संबंधितांना वितरित केल्या जाणार आहेत .रुग्णांसाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे मोफत शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. अतुल जिंतूरकर ,डॉ. विजय जेथलिया, परेश रायठ्ठा, स्मिता चाचणी, स्मिता भक्कड, वीरेंद्र देशपांडे, उमेश बजाज, डॉ.सुजाता नानावटी, एडवोकेट महेश धनावत. प्रतीक नानावटी आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172