जालना- निवडणुकीदरम्यान वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर होत असलेला प्रचार आणि त्यावर होणारा खर्च या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवा! आशा सूचना जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टिन यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
श्रीमती मार्टिन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकी संदर्भात स्थापन केलेल्या विविध विभागांची पाहणी केली. त्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, परवाना कक्ष, तक्रार निवारण कक्ष, एन. आय. सी. तसेच जालना लोकसभा मतदारसंघात ज्या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्या जालना ,भोकरदन आणि बदनापूर मतदार संघातील रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या चार चाकी वाहनांची तपासणी योग्य होते किंवा नाही याची देखील पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार योगिता खटावकर ,आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172