जालना- जालना लोकसभा मतदारसंघात अजून वातावरण तापायला सुरुवात झाली नाही, परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे अनेक निर्बंध लागले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ हे वेळोवेळी बैठका घेत आहेत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत निवडणूक आयोगाचे निर्देशही पोहोचवत आहेत.
आचारसंहिते बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी एक आदेश जारी केला होता. या आदेशामुळे धार्मिक मिरवणुका, पारिवारिक कार्यक्रम, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. परंतु हा सर्व संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी आज Edtv News च्या माध्यमातून दूर केला आहे. सर्व काही स्पष्ट भाषेमध्ये सांगितले आहे. कोणत्या मिरवणुकांवर असणार बंदी? कशाची परवानगी घ्यावी लागणार? कोणाला आहे सूट? या सर्व बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172