मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; 12 रूग्णालयाला 17 लाख 50 हजार रुपये कोविड रुग्णांना परत


जालना
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जिल्ह्यातील बारा रुग्णालयांनी अतिरिक्त दर आकारले होते ाप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देऊन या रुग्णालयांना आगाऊ घेतलेली ही रक्कम सात दिवसात परत करण्याचे आदेश देऊन चांगलाच दणका दिला सात दिवसात ही रक्कम परत करा अन्यथा कारवाईला देखील सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी बेडची कमतरता भासून त्याची टंचाई निर्माण करून कोरोना बाधित रुग्णाकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जायचे. रुग्णाची गरज असल्यामुळे हे शुल्क त्यांनी भरले देखील मात्र शासनाच्या निर्णयानुसार अतिरिक्त शुल्क वसूल करणे हे कायद्याने गुन्हा आहे ,आणि अशा तक्रारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सभागृहांमध्ये या बारा रुग्णालयाच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि ही रक्कम परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान जिल्ह्यातील 291 रुग्णांकडून बारा रुग्णालयांनी 17 लाख 50 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम वसूल केल्याचे पुढे आले आहे यासंदर्भात सर्व रुग्णालयांनी ही रक्कम दोन ते तीन दिवसात परत करण्याची तयारी दर्शवली होती मात्र जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सात दिवस मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ही रक्कम परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

*ही आहेत ती 12 रुग्णालये*
निरामय हॉस्पीटल, जालना क्रिटीकल केअर , सांगळे हॉस्पीटल, ओजस हॉस्पीटल, विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्स, संतकृपा हॉस्पीटल, अंबेकर हॉस्पीटल, जालना हॉस्पीटल, सेवाभारती कोव्हीड हॉस्पीटल, व्यंकटेश्वर हॉस्पीटल, शिंदे बालरुग्णालय, जालना तर अंबड येथील सह्याद्री हॉस्पीटल या 12 रुग्णांलयांनी शासन दरापेक्षा अधिकचे आकारले होते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button