जालना- आज जागतिक महिला दिन, महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा, त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्याचा, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा हा दिवस .या दिवसानिमित्त Edtv jalna या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या वतीने सर्वच महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!.💐💐💐
मैत्रिणींनो, पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आपण शाळेत असताना अनेक वेळा साजरा केला असेल, या दिवशी पूर्ण शाळा हे विद्यार्थी चालवतात किंवा एखादा वर्ग चालवतात. त्यानंतर आत्ता -आत्ता आपण अनिल कपूरचा “नायक” हा चित्रपट पाहिला. या चित्रपटांमध्ये अनिल कपूर हा एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो आणि पुढे काय होतं हे देखील आपणाला माहीतच आहे. तसंच काही आज या महिला दिनाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. पाण्याच्या टाक्या तयार करण्यासाठी लागणारे साचे अनेक देशांमध्ये पाठवणाऱ्या विनोदराय इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आज एका दिवसासाठी एक विद्यार्थिनी कार्यकारी संचालक म्हणजेच एमडी च्या खुर्चीत बसली , खरंतर ती विद्यार्थिनी परंतु एमडी चे अधिकार मिळाल्यानंतर ती कंपनीत फिरत असताना प्रत्येक जण कसं उभा राहून नम्रतेने कंपनी विषयी सर्व माहिती देत होते .नंतर एमडी च्या खुर्चीत बसल्यानंतर पुढे काय झालं ?हे पाहूयात या तरुण विद्यार्थीनीच्या एमडीच्या भूमिकेतून वरील मुलाखती मधून.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.