छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींच्या टोळीला एक वर्षासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे.
पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढत होते. पोलिसांना देखील ही डोकेदुखी झाली होती. या प्रकरणाच्या छडा लावण्यासाठी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी विविध पथके स्थापन करून आरोपींचा तपास लावला. ही एक टोळी असल्याचे समोर आले. या टोळीतील चार प्रमुख सदस्य योगेश विष्णू सिंग वय 22 वर्ष राहणार देवसाळे तालुका नेवास, अभिषेक भरत मोरे वय 18 वर्षे राहणार कुतुबखेडा तालुका पैठण, ओमकार वैजनाथ जगताप वय 22 राहणार घोटण तालुका बदनापूर आणि कल्याण सोमनाथ भांडे व 19 हनुमंत गाव तालुका वैजापूर यार चौघांचा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून हद्दपारचा प्रस्ताव पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी वरिष्ठांकडे सादर केला. हे चारही जण सध्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण परिसरातच राहत होते, वरील चारही आरोपींना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे .पैठणचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलीस हवालदार नरेंद्र अंधारे ,राजेश आटोळे, दीपक सुरवसे प्रमोद मसलकर ,आदींनी हा प्रस्ताव तयार करण्यासाठी सहकार्य केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172