जालना- आता बऱ्यापैकी शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आई वडील शिकवत आहेत मुलींनी शिकून घ्यावे. मजा करायला आयुष्य पडले आहे. त्यामुळे नवरा अब्जोपती असला तरी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मजा काही औरच आहे. म्हणून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे .असा सल्ला आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त तथा ग्राम विस्तार अधिकारी सौभाग्यवती दुर्गा भालके यांनी दिला आहे. त्यासोबत रणरागिणीचे रूप पाहायचे असेल तर “त्या पाच मिनिटांमध्ये कोणी सट्ट्यात सापडावं “असा दमही त्यांनी भरला आहे.edtv news च्या नवरात्रोत्सवाच्या “रणरागिणी 2023 “मध्ये चौथे पुष्पगुंपताना त्या बोलत होत्या.
रणरागिणीला प्रतिक्रिया द्या -8275334004
नवरात्रोत्सवाच्या संकल्पनेबद्दल बोलताना सौ.भालके म्हणाल्या” लहानपणी या उत्सवाची एक महिना अगोदरच चाहूल लागायची ,जत्रा भरायला सुरुवात व्हायची ,पैशांची जमवाजमव सुरू व्हायची, आजीकडून, मामाकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे ढापायचे आणि जत्रेमध्ये रहाट पाळणा खेळायचा .दांडिया खेळायचा,पण आता ते दिवस राहिले नाहीत. वडीलधारी मंडळी लहान मुलांना जत्रेत घेऊन जाताना चे चित्र दिसत नाही, जे त्याकाळी अत्यंत सुंदर चित्र होते आई-वडील आपल्या कडेवर घेऊन , बोटाला धरून जत्रेत जात होते आणि बोट सोडू नको असे आवर्जून सांगत होते.
edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. सुरू झाली आहे .रुबाब दाखविण्यासाठी कोण झाली पोलीस,कोणाला आवडते लाल गोड सेव,कोणती युवती झाली कीर्तनकार,कोण देतं “त्या” 5 मिनिटांची धमकी….आणि बरंच कांही.
सौ.भालके सांगतात,”2012 ला आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्यानंतर कामाची जबाबदारी वाढली,सध्या ग्रामसेवक संघटनेची राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे ,त्यामुळे 22हजार ग्रामसेवकांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. .त्यामुळेच एका वर्षात ग्रामसेवकांच्या फायद्याचे सुमारे वीस शासन निर्णय पारित करून घेण्यात आमच्या संघटनेला यश आले आहे . वरिष्ठांनी केलेल्या प्रयत्नांचं ही यश आहे .आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्यानंतर वाढलेली जबाबदारी लक्षात घेऊन 2017 मध्ये गुंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टरांची टीम बोलावून महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली, आणि त्यामधून सहा महिलांना कर्करोग आजाराचे निदान झाले, या महिलांचे शहरातील दीपक हॉस्पिटलच्या माध्यमातून मुंबई येथे उपचार केल्या गेले. त्याचसोबत गुंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये युवतींसाठी पहिले सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवले ज्यामुळे युवती आणि महिलांची मोठी अडचण दूर झाली .पारंपारिक पद्धतीने वापरले जाणारे कपडे हे दूषित असल्यामुळे महिलांना अनेक आजार होत होते ते आजार या मशीनमुळे कमी झाले आणि याचंच फलित असं झालं की ज्यावेळी माझी बदली झाली त्यावेळी गावातील महिलांनी साडी चोळी देऊन माझी बोळवण केली आणि गावची मुलगी म्हणून वाटी लावले.
ग्रामीण भागात काम करत असताना गावचे राजकारण हे लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणापेक्षाही मोठे असते. त्यामुळे तारेवरची कसरत करत सर्व गावगाडा चालवावा लागतो. अनेक अडचणींच्या वेळी एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे शासनाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या मदतीने हा तिढा सोडविला जातो.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172