बाल विश्वराज्य

अवघ्या १० वर्षीय काव्य अग्रवालचा विश्वविक्रम; ठरला भगवद्गीता लिहणारा सर्वात छोटा लेखक

नागपूर : १८ अध्याय आणि ८०० श्लोक असलेला भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथ आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. भगवद्गीतेत भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला जीवनदानाबद्दल उपदेश केला आहे. मात्र, एखाद्या १० वर्षाच्या चिमुकल्याला भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्णाबद्दलची गोडी असू शकते, हे तुम्ही क्वचितच पहिले असेल. नागपुरातील अशाच अवघ्या १० वर्षीय काव्य अग्रवालने भगवद्गीता लिहून विश्वविक्रम रचला आहे.

काव्य अग्रवालने ‘किडटास्टिक’ (Kidtastic) नावाची भगवद्गीता लिहिली असून, असे करणारा तो जगातील सर्वात छोटा लेखक बनला आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी भगवद्गीता लिहून काव्यने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book of Records) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records) आपले नाव नोंदवले आहे. काव्यने लिहिलेल्या ‘किडटास्टिक’मध्ये त्याने भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. त्याने अध्यायांचे स्वतःच्या शब्दात भाषांतर केले असून प्रत्येक अध्यायातून ‘काव्य काय शिकला’ हे देखील लिहले आहे. हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काव्य म्हणाला की, लहान वयातच भगवद्गीतेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याकडे त्याचा कल होता. नंतर त्याने भगवद्गीतेवरील कार्यशाळा पूर्ण केली, ज्याने त्याला संस्कृत श्लोक शिकण्यास आणि वाचण्यास तसेच भगवद्गीतेचे विविध आयाम समजून घेऊन संशोधन करण्यास प्रेरित केले. आई-वडील आणि आजी-आजोबांच्या पाठिंब्यामुळे काव्यला पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले.

काव्य जिथे जातो तिथे तो आपल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन जातो. काव्यने मूर्तीशी एक जवळीक साधली आहे आणि काव्यचा असा विश्वास आहे की मूर्ती त्याला आयुष्यात चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते. काव्यने स्वतःच्या कल्पनादृष्टीद्वारे (Visualization) पुस्तकाच्या डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. पुस्तक वाचताना मुलांची आवड लक्षात घेऊन काव्याने रंगीबेरंगी चित्रे, भगवान कृष्णाच्या कथा आणि रंगरंगोटीची जागा समाविष्ट केली आहे.

भगवद्गीता आणि भगवान कृष्ण हे आपली प्रेरणा आहेत, असे काव्यचे मत आहे. त्याला मार्गदर्शन करण्यात आणि पुस्तक लिहिण्यात या पवित्र ग्रंथाचा मोलाचा वाटा आहे. काव्यनुसार, भगवद्गीता ही जगभरातील मानवांच्या समस्यांवर उपाय आहे. काव्यचे आई-वडील रश्मी अग्रवाल आणि राज अग्रवाल यांनी काव्यला त्याच्या सर्व उपक्रमांमध्ये साथ दिली आहे. तसेच त्याचे आजोबा महेश आणि आजी मीना अग्रवाल आणि आजी-आजोबा अनिता आणि महेंद्र अग्रवाल हे काव्यच्या संस्कृत आणि शास्त्रांकडे कल असल्यामुळे आनंदी आहेत.

काव्यला मिळालेले इतर पुरस्कार:
१. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट पुणे द्वारा ‘ग्रोथ आयकॉन’. हा पुरस्कार भगवद्गीता या ग्रंथाशी संबंधित आहे.
२. संस्कृत राष्ट्रीय ऑलिम्पियाड, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि २५ हजारांचे रोख पारितोषिक.
३. संस्कृत श्लोक पठणासाठी इंडिया स्टार आयकॉन किड्स अचिव्हर अवॉर्ड
४. ऑक्सफर्ड बिग रीड, जागतिक विजेता. यामध्ये काव्यला आयपॅड देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.

संस्कृत भाषेतील त्याच्या अनेक कर्तृत्वाव्यतिरिक्त, काव्य उत्कृष्ट चित्रकार आहे. बंगाल बोर्डाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये तो विजयी झाला आहे. बंगाल बोर्डातून शास्त्रीय संगीताची परीक्षाही त्याने दिली आणि जिंकली. काव्यला गिटारदेखील उत्कृष्टरित्या वाजवता येते. काव्य सार्वजनिक वक्ता आहे आणि त्याची इंग्रजीवर चांगली पकड आहे. काव्य संस्कृत श्लोक आणि कविता सादरीकरण करतो. तो योगाचा राष्ट्रीय विजेता देखील आहे.

edtv news, nagpur

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button