जालना -जालना शहरात बुधवार दिनांक 21 रोजी जळीताच्या दोन घटना घडल्या .सुदैवाने दोन्हीही घटनांमध्ये जीवित हानी झाली नाही .अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वित्तहानी देखील टळली आहे.
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मस्तगड वरील पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या डीपी ने अचानक पेट घेतला. पेट्रोल पंपाच्या समोरच ही डीपी असल्यामुळे थोडा वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.डीपी समोरच मुख्य रस्ता असल्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. दुसऱ्या घटनेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या मोंढा भागात कडब्याला आग लागली. एका आयशर वाहनांमध्ये हा कडबा भरलेला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तातडीने केलेल्या या प्रयत्नांमुळे आयशर वाहनाला आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. कडबा मात्र जळून खाक झाला. जालना शहरात असलेल्या जुन्या मोठ्यात ही आग लागल्यामुळे आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. या घटनेत देखील सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जालना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे ,बापूराव जाधव, रवी तायडे ,नागेश घुगे, विठ्ठल कांबळे, आदी कर्मचाऱ्यांनी या दोन्ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972