जालना- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त म्हणजेच सोमवार दिनांक 19 रोजी हैदराबाद येथील प्रखर हिंदुत्ववादी वक्ते राजासिंग ठाकूर उर्फ टी. राजा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजा सिंग ठाकूर यांची जालन्यात ही दुसरी सभा आहे.
सकल सनातन हिंदू समाज प्रणित शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज परिसरात ही सभा होणार असून हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संयोजन समितीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष सतीश यादव ,मुख्य मार्गदर्शक मनीषनंद यादव, स्वागताध्यक्ष विजय पवार, शिवराज नारियलवाले, निमंत्रक अमरदीप शिंदे ,विवेक वैद्य, सोमेश काबलीये, जगन्नाथ कटारे, दत्ता पवार कपिल जांगडे, आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172