जालना- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना आणि आत्मा(Atma) म्हणजेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे दिनांक एक ते पाच मार्च दरम्यान गोदा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, तीन वेळा तारीख बदलूनही चौथ्या वेळी आयोजित केलेल्या या महोत्सवाचा सर्वच बाजूंनी फज्जा उडाला आहे . शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे आत्म्याच्या या प्रदर्शनातून “आत्माच” गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतीचा कोणताही विषय असो त्याचा आत्मा हा शेतकरी असतो, परंतु या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्याशिवाय इतर व्यावसायिकात जास्त आले आहेत आणि हे असे व्यवसायिक आहेत जे दिवाळी -दसऱ्याच्या तोंडावर असलेल्या छोट्या- मोठ्या प्रदर्शनातून कांदा छिलने, बटाटा छिलने, चकल्या करणे, कुरडया- पापड्या विकणे तयार कपडे ,लोणचे, देवपूजेचे साहित्य विकणे असे आहेत. प्रदर्शन म्हंटल्यावर हे येणे देखील अपेक्षित असते मात्र खरेदीदारच नसल्यामुळे हे स्टॉल देखील ओस आहेत. खरंतर अशा प्रदर्शनांमध्ये शेती उत्पादनाची आणि धनधान्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणे अपेक्षित असते परंतु या प्रदर्शनात एकही असा स्टॉल नाही जिथे 50 किलो एक क्विंटल गहू ,तांदूळ डाळ असे धान्य मिळेल .याचे कारण म्हणजे सध्या ,ज्वारी, गहू हरभरा काढण्याचे कामे चालू आहेत आणि सर्व बळीराजा हा शेतीमध्ये गुंतलेला आहे त्यामुळे मुळात ही तारीख चुकीची आहे.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने तीन वेळा या कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यानुसार दिनांक 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान या प्रदर्शनासाठी प्रशासनाने जाहीर निविदा काढली मात्र ती कोणीच भरली नाही त्यानंतर दिनांक नऊ ते 13 फेब्रुवारी ती तारीख पालकमंत्री महोदयांच्या सोयीची नव्हती म्हणून सांगितल्या जात आहे तिसऱ्यांदा दिनांक 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान हा कृषी महोत्सव आयोजित केला होता परंतु त्यावेळी जालन्यात महासंस्कृती महोत्सवाचे पडघम वाजू लागले त्यामुळे अधिकाऱ्यांना वेळ नव्हता. खरंतर कृषी महोत्सव डावलून संस्कृती महामहोत्सव घेतला मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला. त्यानंतर हा कृषी महोत्सव देखील केवळ शासनाने दिलेल्या निधीतून “कार्यक्रम” करण्यासाठीच हा महोत्सव आहे की काय? असे चित्र पाहायला मिळत आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172