Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » सेवानिवृत्तांच्या पदरी पुन्हा वनवास ;पेन्शन अदालत अचानक पुढे ढकलली
    Jalna District

    सेवानिवृत्तांच्या पदरी पुन्हा वनवास ;पेन्शन अदालत अचानक पुढे ढकलली

    EdTvBy EdTvJuly 6, 2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती विषयीच्या अडचणी सुटता सुटत नाहीत. विशेष करून जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारच्या अनेक अडचणी आहेत आणि एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्यांच्याच कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे दिनांक सात जुलै रोजी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली होती. मात्र अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे पुन्हा एकदा या सेवानिवृत्तांची तारांबळ उडणार आहे .पेन्शन अदालत मध्ये तक्रार दिल्यानंतर ती लवकर सुटेल अशी भोळी भाबडी अशा तक्रार देण्यापूर्वीच धुळीत मिळाली आहे .ज्या पेन्शनधारकांपर्यंत तारीख लांबल्याची माहिती पोहोचणार नाही अशा अनेक पेन्शन धारकांना उद्या जिल्हा परिषदेमध्ये येऊन विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे आणि आत्तापर्यंत मारलेल्या चकरा नंतर पुन्हा एकदा वनवास सहन करावा लागणार आहे. दरम्यान या अदालतीमध्ये थेट म्हणजेच आयत्या वेळेसच तक्रारी देण्याचे नियोजन असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने संबंधित तक्रारदाराशी संपर्कही साधता येत नाही. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे ही तारीख पुढे ढकलली असल्याचे सांगून संबंधित संघटनेचे अध्यक्षांना तसे कळवले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत.

    औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानूसार दि. 7 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तथापि अपरिहार्य कारणास्तव आता पेन्शन अदालत मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जालना जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  पेन्शन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जिल्हा परिषद, जालना यांनी केले आहे.

    ताज्या बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

    zp ceo जालना जिल्हा परिषद जिल्हा परिषद पेन्शन अदालत मुख्य कार्यकारी अधिकारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleजालन्याच्या पोलिसांचा डंका; नऊ सुवर्ण आणि पाच रजत पदक मिळवत नैपुण्य, कौशल्य, आणि गुणवत्तेमध्ये विभागात प्रथम
    Next Article …आता त्या शिवलेल्या सुटाचं काय करायचं! केंद्रीय मंत्री गडकरी यांची मिश्किल टीका
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    June 1, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,180 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,140 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News June 1, 2025

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर…

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.