निवड समितीचे पदाधिकारी डॉ. शिगेदार यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
जालना- येथील अस्थिरोग तज्ञ आणि महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी सचिव डॉ प्रकाश सिगेदार यांचा बुधवार दिनांक २८ जुलै रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोशायरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
DDI आणि cloud फौंडेशनच्या वतीने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांचा जीवनगौरव तसेच इतर पुरस्कार देऊन राज्यपालांनी सत्कार केला.
डॉ प्रकाश सिगेदार यांनी पुरस्कार निवड समितीचे सदस्य(Jury)म्हणून काम पाहिले होते. समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक तथा महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर हे होते.
Allopathy, आयुर्वेद, दंतचिकित्सा, होमिओपॅथी या क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांना या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. कामत, डॉ. मनोज देशपांडे, डॉ. संजय कदम, यांची आयोजक म्हणून उपस्थिती होती.
*ताज्या आणि सविस्तर बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app.