जालना जिल्हा

मूर्ती वेस पडली: आठ दिवस वाहतूक विस्कळीत

जालना- शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या निजामकालीन मूर्ती वेसचा काही भाग ढासळल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पुढील आठ दिवस ही वाहतुक बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

निजाम कालीन म्हणजे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती वेस आहे. सर्वे नंबर 382 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 21 मध्ये ही वेस येते. याची मालकी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे आहे. त्यामुळे याची देखभाल दुरुस्ती ही या मंडळाने करायची आहे, मात्र हद्द नगरपालिकेची असल्यामुळे ती नगरपालिकेने दुरुस्त करावी यासाठी या मंडळाने जालना नगरपालिकेला ना हरकत प्रमाणपत्र 1 जुलै2021 ला दिले आहे. कादरी हुसेन मोयोद्दिन मुजावर खादिम यांनी दिनांक 1जुलै 2020 रोजी महाराष्ट्र राज्य  वक्फ मंडळाकडे ही वेस दुरुस्त करण्याची मागणी केली होती .त्यानुसार जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य  वक्फ मंडळाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते आणि या मंडळाने दिनांक एक जुलै 2021 रोजी हे प्रमाणपत्र दिले आहे. शिवाजी पुतळ्या भागाकडून कडून कादराबाद मध्ये येणारा हा मुख्य रस्ता आहे. हा रस्ताच बंद झाल्यामुळे शिवाजी पुतळा, फुल बाजार मार्गे किंवा शिवाजी पुतळा मंगळ बाजार मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र कादराबाद मधून शिवाजी पुतळ्या कडे जात असताना पूर्ण परिसर ओलांडल्यानंतर वाहतूक बंद असल्याचे लक्षात येत आहे त्यामुळे मंगळ बाजारात देखील वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच मंगळवारी इथे बाजारही भरतो .आज आणि उद्या शासकीय सुट्टी आहे आणि त्यानंतर देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल आणि हे पूर्ण होईपर्यंत सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या भागातून जाण्या-येण्यासाठी नागरिकांना तूर्तास तरी त्रास सहन करावा लागणार आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा edtv jalna app.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button