राज्य
जमात- ए- हिंद कडून पूरग्रस्तांना मदत रवाना
जालना- कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आणि अनेकांना जीवही गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या आणि गरजूंना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या हेतूने येथील जमात -ए- हिंद या सामाजिक संस्थेच्या वतीने दैनंदिन उपयोगाचे साहित्य रात्री रवाना करण्यात आले.
जमात-ए- हिंदच्या अध्यक्षांनी सुचविल्या नुसार जालना शाखेच्या वतीने अन्नधान्याचा पुरवठा न करता घरामध्ये आवश्यक असणारे साहित्य देण्यात आले आहे. त्यामध्ये सतरंजी, पांघरून, बकेट, झाडू, चटई, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, साबण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. सुमारे तीन लाख रुपयांचे हे साहित्य शुक्रवारी रात्री कोकण कडे रवाना झाले.
राज्य आणि सविस्तर बातम्या पहाण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com