Taluka

खंडणी बहाद्दर चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जालना- वारंवार माहिती अधिकारात माहिती मागून महिला तलाठ्याला त्रास देणाऱ्या चार खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्त्यांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मार्च 2020 मध्ये झालेल्या गारपिटीच्या नुकसानीच्या अनुदानात भ्रष्टाचार केल्याचाआरोप परतूर तालुक्यातील एदलापूर येथील महिला तलाठी पुष्पा परवरे यांच्यावर केला होता आणि वारंवार त्या संदर्भात माहिती मागवत होते. 
 या तक्रारीशी  तलाठी श्रीमती परवरे यांचा काहीही संबंध नव्हता, तरीही त्यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात वेगवेगळे माहिती अधिकारांतर्गत अर्ज देऊन त्रास देने व ब्लॅकमेलिंग सुरू केले होते.
 त्या प्रतिसाद कार्यकर्त्यांना देत नसल्याने त्यांना धमक्या देणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, असे प्रकार सुरूच होते. काही दिवसांपूर्वी या लोकांनी श्रीमती परवरे यांना तहसील कार्यालयात गाठून प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
 तलाठ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या लोकांनी तहसील कार्यालयातील एका कारकुनाला काल दुपारी व्हाट्सअपवर मेसेज पाठवून हे प्रकरण मिटविण्यासाठी साडेसहा लाख रुपये द्यावे लागतील, नसता तलाठी कशी नोकरी करते, ते पाहतो, अशी धमकी दिली होती.
याप्रकरणी तलाठी पुष्पा परवरे यांच्या फिर्यादीवरून परंतु पोलिसांनी बाळासाहेब आढाव, संतोष आढाव, गंगाधर आढाव, रामेश्वर पवार (रा. एदलापूर) यांच्याविरुद्ध खंडणी आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे हे या प्रकरणाचा तपास करीत  आहेत.

ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड कराedtv jalna app*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button