Advertisment
जालना जिल्हा

विश्‍वविक्रमी हिंदवी चौरे ला आष्टीकरांचे 25 हजारांचे बक्षीस

जालना-
अवघे नऊ वर्ष वय असलेल्या व पाच मिनिटात ऑनलाइन शंभर योगासने करण्याचा विश्वविक्रम नावावर असलेल्या  बीड जिल्ह्यातील हिंदवी चौरे या चिमुरडीने आष्टीत केलेल्या वेगवेगळ्या योगासने करून दाखवली.  आष्टी ग्रामपंचायत ने ११ हजार व गावकऱ्यांनी१५ हजार असे२५ हजाराचे पारितोषिक देत भगवान बाबा नगर व आष्टीत या चिमुरडीचा नागरी सत्कार करीत पाठीवर कौतुकाची थाप  मारली आहे.

मूळ बीड जिल्ह्यातील जीवाची वाडी येथील रहिवासी असलेली हिंदवी परमेश्वर चौरे ही नऊ वर्षाची चिमुरडी सध्या वाशी येथे आई वडिलांसोबत राहते .आष्टी येथील भगवान बाबा नगर येथे नातेवाईक राहत असल्याने येथील गावकऱ्यांनी हिंदवी हिला मंगळवारी भगवान बाबा नगर येथे बोलावले होते. त्या ठिकाणी तिने आपली कला सादर केल्याने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सद्स्य ,गावकरी यांनी तिला आष्टी येथे बुधवारी बोलावले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात या चिमुरड्या मुलीने लवचिक आशा प्रकारचे शरीर हलवत  थक्क करणारे योगाचे अनेक प्रात्यक्षिक सादर केले.  पंधरा मिनिटात तिच्यावर अक्षरशः बक्षिसांची लयलूट झाली. अवघे नऊ वर्ष वय असलेल्या हिंदवी ही वयाच्या चौथ्या वर्षांपासून योगासने करीत असून चौथ्या वर्षी तिच्या हाताचे सांधे निसटली होते. त्यावेळी डॉक्टराणी व्यायाम करण्यास सांगितले होते तेंव्हा पासून तिला योगासने करण्याचा छंद लागलेला आहे. तसेच दिवसभरात तीन तास व्यायाम करते तिने म्हैसूर येथे तीन महिने योगाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. तिला खूप मोठे करण्याची इच्छा आहे मात्र परिस्थिती नसल्याने शासनाने मदत करावी असे तिचे वडील परमेश्वर यांनी सांगितले
आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, माजी सरपंच भागवत कडपे काँग्रेस चे जिल्हा सचिव राहेमत पठाण ग्रामसेवक एन. बी. काळे, ग्रा .प. सदस्य मधुकर मोरे, नसरुल्लाह काकड ,राजू आघाव, बाबासाहेब बागल,भगवान कांबळे, सत्तार कुरेशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण टेकाळे, आदींची उपस्थिती होती.

*ताज्या आणि सविस्तर बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button