उत्तराखंडच्या स्पर्धेत चमकले जालना चे खेळाडू

जालना- उत्तराखंड येथे पार नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खुल्या क्रास बो शूटिंग स्पर्धेत जालन्याच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. या स्पर्धेत जालन्याची कुमारी संजना जैस्वाल हिने वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक कांस्य पदक प्राप्त केले .तसेच एकूण 50 वर्ष वयोगटातील पुरुष स्पर्धेत जे.ई.एस. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. हेमंत वर्मा यांनी वैयक्तिक आणि मिश्रित प्रकारात सलग दोन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत.
विशेष बाब म्हणजे कुमारी संजना हिने जे.ई.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करत डॉ. हेमंत वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले होते. तसेच कुमारी संजना हीने रशिया येथे झालेल्या जागतिक क्रास बो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, प्रबंधक विजय गौड, अधीक्षक अशोक फदाट बी. जी. साळुंके आर. के. ठोंबरे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*क्रॉस बो प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार*.
प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, महाविद्यालयाच्या वतीने क्रॉस बो क्रीडा प्रकाराचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून जालना परिसर व जिल्ह्यातील खेळाडूंनी यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. बजाज यांनी याप्रसंगी केले.
ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtv jalna app