उद्यापासून मालिकांना सुरुवात
जालना- जालना शहरातील महत्वपूर्ण व्यक्ती, संस्था आणि व्यक्ती यांच्याविषयीची खास माहिती असलेल्या अशा वैविध्यपूर्ण मालिका येत्या रविवार पासून edtv jalna वर जालनेकरांना पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील राजकारण, सामाजिक उपक्रम, गुन्हेगारी,आदी विषयांवर अपडेट बातम्या देणारे Edtv Jalna पोर्टल आणि डिजीटल जालन्याचा संकल्प घेऊन कार्यरत असलेले Orbit Jalna अँप, ही नव्या युगाची दोन्ही माध्यमे सयुंक्तपणे जालनेकरांसाठी या वैविध्यपूर्ण मालिका घेऊन येणार आहे. या मालिकेत खालील आशय आणि विषय असणार आहेत.
*जालनेकारांचे श्रद्धास्थान*
भाविकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ही पहिली मालिका. यामध्ये जालन्यातील सर्व धर्मियांच्या श्रद्धा स्थानांच महत्व, वैशिष्ट्य यासोबत कोरोना काळ आणि त्यानंतर भविष्यात या संकटांना तोंड देण्यासाठी कशी खबरदारी घेण्यात येत आहे. याची माहिती या मालिकेत असणार आहे.
*माझा दिनारंभ*
या मालिकेमध्ये प्रशासनातील अधिकरी, जनमान्य सामाजिक व्यक्तिमत्व, उद्योगपती, पुढारी, कला क्षेत्रातील मान्यवरांच्या दिनचर्येचा आरंभ कसा होतो. याविषयी सर्वसामान्य माणसांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळतील .
*जालन्याची हिरकणी*
या मालिकेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या कर्तबगार महिलांच्या यशोगाथा असतील.
*माणिक मोती*
लहान मुलांच्या अंगातील कलागुणांना वाव देऊन त्यांचे भावविश्व सामान्य माणसाला समजण्यासाठी आणि या चिमुकल्यांना प्रोत्साहन देणारी हि मालिका असेल. सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या संगीत आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत विषय यात असतील. मालिकेत सहभागी होण्यासाठी असणाऱ्या नियम व अटी ॲप वर संगीत विभागात पहायला मिळतील.
*काय कमावलं काय गमावलं !*
कोविडच्या च्या काळात डॉक्टरांना समाजाकडून विविध पदव्या मिळाल्या. कोणी देवदूत, कोणी देवाचे अवतार तर कोणी कसाई देखील समजलं. अशा सर्व चांगल्या -वाईट प्रसंगांना स्वतःच्या जिवाची बाजी लावून डॉक्टर मंडळींनी तोंड दिलं. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या अशा काही हॉस्पिटलचा आढावा घेणारी “काय कमावलं, काय गमावलं” ही मालिकाअसणार आहे.
चला तर मग आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड करा edtv jalna app.