पंचमुखी सदासुखी म्हणणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी तळमळshradhasthan
जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत. ‘पंचमुखी सदासुखी’ याचा अनुभव भक्तांना नेहमीच येतो .
या मंदिरात बाराही महिने भाविकांची प्रचंड गर्दी असते. मंदिर परिसरातच शनिमहाराज, मारुती, दत्तात्रय, पांडुरंग रुक्मिणी, दुर्गामाता, हि मंदिरे असल्यामुळे दिवसभर येथे भाविकांची वर्दळ असते. कोरोनाची महामारी सुरू झाली आणि या मंदिराचे दार भाविकांसाठी बंद झाले. पंचमुखी च्या दर्शनासाठी भाविकांची तळमळ मात्र कायम आहे. मंदिर जरी बंद असले तरी जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन भाविक दर्शन घेतातच. मंदिर बंद असल्याचा फटका व्यवस्थापनाला बसलाच आहे ,मात्र देखभाल दुरुस्तीचा खर्च तर करावाच लागणार! त्यामुळे नेहमीप्रमाणे दानपेटीत आलेली रक्कम काढण्यासाठी दानपेटी उघडली तर ती रिकामी निघाली. कारण दानपेटीत काही आलेच नाही ,त्यामुळे दानशुरांची मदत घेऊन मंदिराचे व्यवस्थापन सुरू आहे.
उत्पन्ना असो अथवा नसो मंदिरामध्ये शिवलींगा भोवती सायंकाळची आरास मात्र कायम चालू असते. अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने फुलांच्या सजावटीने केलेही आरास मनाला प्रसन्न करते. या मंदिराची विशेष बाब म्हणजे शिवलिंगाच्या खालीच एक भूमिगत ध्यान मंदिर आहे. जिथे पुरातन शिवलिंग आणि इतर देवता स्थापित आहेत. आजही या भूमिगत मंदिरामध्ये नाग देवते साठी रोज दूध ठेवल्या जाते. आणि नाग देवता येऊन ते दूध पितात अशी माहिती या मंदिराचे व्यवस्थापक तथा पुजारी प्रताप महाराज चौधरी यांनी दिली आहे. या माहिती सोबतच मंदिरे बंद असल्यामुळे व्यवस्थापनावर येत असलेला ताण देखील त्यांनी प्रशासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि शासनाने आर्थिक मदत करावी , त्यात सोबत लवकरात लवकर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
*ताज्या 26 तर बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app.*9422219172.