जालना जिल्हा
मराठवाड्यात डेल्टा प्लस चा शिरकाव
जालना-राज्यात डेल्टाप्लस रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता ही संख्या 21 वरून 45 वर गेली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 45 रुग्णा पैकी 27 पुरुष आणि 18 स्त्रियांना याची लागण झाली आहे.रत्नागिरी, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे याठिकाणी हे रुग्ण आढळले.दरम्यान मराठवाड्यात देखील या व्हेरियंट चा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्ण आढळक्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान लसीकरणाच्या बाबतीत केंद्राने सहकार्य केल्यास अधिक गती वाढवून कोरोनवर नियंत्रण लवकर मिळवणे शक्य असल्याचे सांगत टोपे यांनीअधिक लसी देण्याची केंद्राला पुन्हा एकदा विनंती केलीय.
*ताज्या आणि सविस्तर बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app,
9422219172*
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com