Serialsshradhasthan

बुधवारच्या गणपतीचे मंदिर बंद ; उपवधुंमध्ये नाराजीshradhasthan

 

जालना -हिंदू संस्कृती मध्ये देव-देवतांना सर्वात पहिले स्थान आहे. कुठलेही संकट आले की सामान्य माणूस शरण जातो मी देवाला ,आणि शरण आलेल्या व्यक्तीला त्याचे काम झाले की “देव पावला” असं समजतात . यातून वाढत जाते ती देवावरची भक्ती आणि निष्ठा. अशीच भक्ती आणि निष्ठा ही जालना शहरातील नाथबाबा गल्लीत असलेल्या नाथबाबा मंदिरावर भाविकांची आहे. नाथ बाबांचे मंदिर याच्यासोबतच या मंदिराला बुधवारचा गणपती म्हणून देखील लोक ओळखतात. अन्य वेळी इथे गर्दी तर असतेच मात्र जास्त गर्दी असते ती बुधवारी, आणि ती देखील महिलांची आणि उप-वधूंची. या मंदिरात पाच किंवा दहा वारा केल्यानंतर मुलींचा विवाह योग्य ठिकाणी आणि लवकर जुळतो असा समज वधू माता- पित्या मध्ये आहे. मंदिराच्या नावाने नाथबाबा गल्ली देखील आहे .मुख्य रस्त्यावर असलेल्या या मंदिराला भव्य गाभारा आहे आणि प्रवेशद्वारही आहेत. गेल्या अठरा महिन्यापूर्वी लावलेले कुलूप आजही जशाला तसंच या मंदिरात आहे.  बाजूने असलेल्या एका छोटा दारातून पुजारी आत मध्ये प्रवेश करून दैनंदिन ,पूजा, आरती, उपासना करतात.

मंदिराच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या फुलांच्या दुकानदारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. कारण जेवढा धंदा सहा दिवसांमध्ये होतो तेवढाच धंदा एका दिवसात म्हणजे फक्त बुधवारी होतो. आणि गेल्या आठ महिन्यांपासून हा धंदाच बंद आहे. त्यामुळे या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे .अशीच काही परिस्थिती परंतु “आडकीत्यात सुपारी” म्हणतात तशी मंदिराच्या पुजाऱ्यांची झाली आहे. मंदिर बंद असल्यामुळे येणारा भाविक बंद झाला आहे आणि पर्यायाने दानपेट्या रिकाम्याच आहेत .अन्य वेळी दानपेटी सोबतच महिलावर्ग दानधर्माचा निमित्ताने धनधान्य देखील मंदिरात अर्पण करतात .मात्र सध्य परिस्थितीमध्ये या मंदिरातील धान्याचे बकीट देखील रिकामेच आहेत. सर्व काही रिकामा असताना पुजाऱ्यांना मिळणार तरी काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे .याविषयी मंदिराचे पुजारी सुभाष महाराज म्हणाले की, सर्वच बंद आहे त्यामुळे उत्पन्न काहीच नाही, मात्र देवाची पूजा ही बंद करता येत नाही आणि व्यवस्थापनावर तरी किती अवलंबून राहणार! त्यांनादेखील उत्पन्न नसल्यामुळे आमचे मानधनही    रखडले आहेत. या सर्वच बाबींचा परिणाम मंदिरावर होत आहे. 

 

मंदिर बंद असल्याचा परिणाम हा महिलांवर महिला वर्गावर देखील झालेला आहे .नाथ बाबांच्या मंदिरात गणपतीची पांढरीशुभ्र चांदीतील मूर्ती आहे. भक्तांना पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. आणि त्या अनुषंगाने दर बुधवारी महिला आणि त्यांच्यासोबत उपवर-वधू यांची जास्त गर्दी असते. बहुतांशी महिला आणि उपवर-वधू या गणपतीला नवस करतात आणि तो पूर्ण होतो असा विश्वास इथे येणाऱ्या भाविकांना आहे. त्यामुळे चतुर्थीसह दर बुधवारी येथे प्रचंड गर्दी असते . शासनाने पुजारी यांचे मानधन देऊन विज बिल पूर्णपणे माफ करावे अशी मागणी या मंदिराचे उपाध्यक्ष मेघराज चौधरी यांनी केली आहे. दानपेट्या रिकाम्या असल्यामुळे सुमारे 20 ते 22 कर्मचाऱ्यांचे मानधन द्यायचे कुठून? हा मोठा यक्ष प्रश्न आहे .दीड वर्षांपासून विश्वस्त मंडळीच कसाबसा हा खर्च करताहेत मात्र आता  अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मंदिरे उघडावीत अशी मागणीही मेघराज चौधरी यांनी  केली आहे.

.

*ताज्या आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app,9422219172*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button